Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार! (Video)

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार! (Video)
शरीरावर होणार्‍या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली आहे. रूग्णाला बेशुद्ध करून डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात. पण बंगळुरूच्या एका रूग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया चालू असताना 32 वर्षांचा तरूण संगीतकार गिटारच्या तारा छेडून डॉक्टरांना मदत करत होता.
 
म्यूझिशियन डायस्टोनिया या दूर्धर न्युरोलॉजिकल डिसऑर्डरने हा तरूण आजारी होता. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील काही विशिष्ट भाग जाळण्यात येतात. एका वृत्तानुसार तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या दरम्यान हा तरूण गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोट व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याला लक्षात आले. शस्त्रक्रियेवेळी गिटार वाजवत असताना मेंदूतील नेमक्या कोणत्या भागात समस्या निर्माण होते, हे कळण्यासाठी तो असे गिटार वाजवत राहिला. त्याच्या गिटार वाजवण्यामुळे व्यवस्थित शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. सध्या या अनोख्या शस्त्रक्रियेचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली!