Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

Twitter इंडियामधून मनीष माहेश्वरीला काढून टाकले, आता अमेरिकेत जा‍तील नवीन भूमिकेत

manish-maheshwari-removed-from-twitter-india
, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (18:51 IST)
Twitter इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मनीष माहेश्वरी यांना ट्विटर इंडियामधून काढून टाकण्यात आले आहे. भारतात सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनीष माहेश्वरीला अमेरिकेत बोलावण्यात आले आहे. ते आता सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वरिष्ठ संचालक म्हणून कंपनीच्या कामाची देखरेख करेल. मनीष माहेश्वरी एप्रिल 2019 मध्ये ट्विटरमध्ये सामील झाले. ते सुमारे अडीच वर्षांपासून ट्विटरमध्ये कार्यरत आहे.
 
Twitterचे JPAC उपाध्यक्ष Yu san  यांनी अमेरिकेत ट्विटरवर माहेश्वरीचे स्वागत केले आहे. यासोबतच त्यांना अमेरिकेत मिळालेल्या नवीन भूमिकेसाठी माहेश्वरीचे अभिनंदनही केले आहे. सोशल मीडियावरही लोक माहेश्वरीचे अभिनंदन करत आहेत. पण कंपनीने अचानक माहेश्वरीला भारतातून काढून टाकण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न लोकांनाही सतावत आहे. माहेश्वरीचे नाव गेल्या काही काळापासून वादात आहे.
 
सरकारसोबतच्या भांडणात कंपनीचा मोठा निर्णय
18 एप्रिल 2019 रोजी नेटवर्क 18 वरून ट्विटर इंडियामध्ये सामील झालेले मनीष माहेश्वरी आता अमेरिकेत कंपनीसाठी आपल्या सेवा देतील. ट्विटरच्या प्रवक्त्याने या विषयावर सांगितले की मनीष ट्विटरसोबतच राहतील याची आम्ही खात्री करू शकतो. पण आता ते या कंपनीत नव्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष माहेश्वरी हे सॅन फ्रान्सिस्को येथे वरिष्ठ संचालक, महसूल धोरण म्हणून काम करतील. भारतात ट्विटर आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या भांडणात कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"जन-गण-मन" राष्ट्रगीत गाण्याचे नियम