मला जो सल्ला तुम्ही देत होतात तो तुम्हीच आता आचरणात आणा असा सल्ला सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोहन सिंग यांनी म्हटलंय की “त्यांनी आता मला जो सल्ला दिला होता तो स्वत: अंमलात आणावा आणि अधिक बोलणं सुरू करावं”असे म्हटले आहे.
२०१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी याविषयावर काहीही प्रतिक्रिया न दिल्याने भाजपचे नेत्यांनी टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनीही आपल्यावर टीका केल्याचं बातम्यांद्वारे आपल्याला कळालं होतं असं सिंग म्हणाले. निर्भया प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की कायद्यात बदल करण्यापासून सरकारच्या हातात ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी केल्या होत्या. जम्मू कश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्काराच्या घटनांनंतर नरेंद्र मोदी हे काय बोलतात याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे.