Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकला चोख प्रत्युत्तर देणार - मनोहर पर्रीकर

पाकला चोख प्रत्युत्तर देणार - मनोहर पर्रीकर
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (13:56 IST)
काही दिवसांपूर्वी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासू पाकिस्ताने सीमारेषेवर कुरापती सुरु केल्या आहेत. अनेकदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. याकडे पाहाता पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देणार, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
 
 दुसरीकडे,  जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद झालेल्या जवानाचे नाव राय सिंह असून ते हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचा 246 धावांनी विजय!