भारताच्या प्रवेशद्वारातून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे. पुढील 24 तासात केरळच्या बहुतांश भागात तसंच तामिळनाडूमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागार परिसरात होईल. दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होईल अशी चिन्हं आहेत. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची शक्यता आहे.