Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Terror attack in Pahalgam बायसरनमध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी

terrorist
, मंगळवार, 22 एप्रिल 2025 (16:44 IST)
Jammu and Kashmir's News: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला बायसरन गवताळ प्रदेशाजवळ झाला. या हल्ल्यातून वाचलेल्या एका महिलेने फोनवरून सांगितले की, "माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि इतर सात जण जखमी झाले आहे." महिलेने आपली ओळख उघड केली नाही परंतु जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदतीचे आवाहन केले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या तुकड्या त्या भागात पाठवण्यात आल्या. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा दलांना बायसर भागात पाठवण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. परिसरात शोध मोहीम सुरू आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पहलगाम पर्यटकांनी गजबजलेले असताना हा हल्ला झाला. अशी माहिती समोर आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलापूर : सांगोला तालुक्यात गर्भवती महिलेने केली आत्महत्या