मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात विवाह बंधनात अडकण्यासाठी आतुर एका जोडप्याचे नातेवाईक जेव्हा त्यांचे लग्न करवायला तयार झाले नाही तर त्यांनी सरळ मुख्यमंत्र्याकडे अपील केली. मुख्यमंत्र्याकडे अपील आल्यावर प्रशासन सतर्क झाला आणि नातेवाइकांनी नकार दिल्यावरही त्या जोडप्याचे विवाह करवण्यात आले.
सूत्रांप्रमाणे राजकुमारी मौर्य आणि गौतम जाटव या दोघांचे लग्न 2012 साली ठरले होते. परंतू काही कारणांमुळे दोघांचा विवाह टळला आणि नंतर दोघांच्या नातेवाइकांनी विवाहाला नकारच दिला. या दरम्यान हे दोघं भावनात्मक रूपाने एकमेकांशी जुळले होते म्हणून नातेवाइकांचा निर्णय त्यांना मान्य नव्हता.
या दरम्यान 5-6 दिवसांपूर्वी राजकुमारीने याबद्दल मुख्यमंत्री हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. तेव्हा प्रशासनाने दोघांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला, परंतू तिथून सकारात्मक उत्तर मिळाले नाही म्हणून गुरुवारी प्रशासनाने कोर्ट परिसरात दोघांचा विवाह संपन्न करवला.