Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरदेवाशिवाय शेकडो मुलींचे लग्न,नववधूंनी स्वतःला हार घातले

नवरदेवाशिवाय शेकडो मुलींचे लग्न,नववधूंनी स्वतःला  हार घातले
, बुधवार, 31 जानेवारी 2024 (14:20 IST)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राधान्य दिलेल्या सामूहिक विवाह योजनेत घोटाळा उघडकीस आला आहे. मणियार, बलिया येथे 25 जानेवारी रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात शेकडो वधूचें  वरांशिवाय विवाह झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नववधू स्वत: त्यांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. अनेक वधू आधीच विवाहित असल्याचे सांगितले जाते. इतकंच नाही तर अनेक अल्पवयीन मुले वर म्हणून लग्नासाठी बसले आहेत. व्हायरल व्हिडिओची दखल घेत सीडीओ ओजस्वी राज यांनी तीन सदस्यीय तपास पथक तयार केले आहे.

समाजकल्याण विभाग सामूहिक विवाह आयोजित करतो. यामध्ये गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न सरकारी खर्चाने केले जाते. एका जोडप्यावर सरकार 51 हजार रुपये खर्च करते. मणियार इंटर कॉलेज मैदानावर झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 568 जोडप्यांचा विवाह झाला. या समारंभात रांगेत उभ्या असलेल्या बहुतेक वधू वराच्या अनुपस्थितीत स्वतःहून हार घालतात. परिसरातील लोकांचे म्हणणे आहे की, लग्नातील 90 टक्के वधू-वर बनावट असतात. अशा अनेक महिलांचा समावेश होता ज्यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

लग्नसमारंभात काही वरात अल्पवयीन ही होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव कुमार यादव सांगतात की ब्लॉक स्तरावरील पडताळणी अहवालाच्या आधारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात काही अनियमितता झाली असल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

सीडीओ ओजस्वी राज यांनी सामूहिक विवाहातील फसवणुकीची चौकशी करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अपंग अधिकारी आणि जिल्हा मागासवर्गीय अधिकारी यांची तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तसेच या योजनेंतर्गत दिले जाणारे शासकीय अनुदानही चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या यादीची पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच या योजनेंतर्गत अर्ज केलेल्यांवरही कारवाई केली जाईल, असे सीडीओचे म्हणणे आहे.
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांना 14 वर्षांची शिक्षा