मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात भीषण अपघात झाला आहे. येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये सर्व लोक बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात आग कशी लागली हे अजून समजू शकलेले नाही. पण, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटचे कारण सांगितले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लिफ्टमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. मृतांमध्ये एक निष्पाप बालक आणि तीन महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.#WATCH | Tamil Nadu: A huge fire broke out at a private hospital in Dindigul, fire fighting operations underway. pic.twitter.com/FnjEG91ca6
— ANI (@ANI) December 12, 2024