राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांतर्फे मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असं रुप दिलं जात आहे. त्याविरोधात मीरा कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या निवडणुकीला जातीचं स्वरुप देणाऱ्यांना त्यांनी चांगलंच ठणकावलं आहे.
समाजाला पुढे नेण्यासाठी जातीला एका गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवे, असे त्या म्हणाल्या.मीरा कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील साबरमती आश्रमातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आपण सुरुवात करणार आहोत, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं.