Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालकाच्या अतिघाईमुळे कंटेनरला धडकला मिनी ट्रक, 6 जणांचा मृत्यू

चालकाच्या अतिघाईमुळे कंटेनरला धडकला मिनी ट्रक, 6 जणांचा मृत्यू
, शुक्रवार, 14 जून 2024 (11:42 IST)
दोन वाहन चालकांबरोबर तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जेव्हा की एकाला रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील कृष्ण जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एक कंटेनर वाहन आणि मिनी ट्रक यांच्या भीषण धडकेमध्ये कमीतकमी सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे घडली आहे. दोघी वाहनांच्या चालकांचा आणि इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. 
 
मछलीपट्टनमचे डीएसपी सुभानी म्हणाले की, "लाकडाचे लठ्ठे घेऊनजाणार्या ट्रॅकटरला ओवरटेक करतांना मिनी ट्रक कंटेनर लॉरीला धडकला. यामध्ये पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये दोन्ही वाहन क्षतिग्रस्त झाले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाऊस आणि दरड कोसळल्याने 6 लोकांचा मृत्यू, सिक्कीमध्ये 1500 पर्यटक अडकले