Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाच जणांनी महिलेसोबत दुष्कर्म करुन सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडिओ

Misdeed video
राजस्थानच्या पाली जिल्ह्यात पाच जणांनी एका 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत दुष्कर्म करुन त्याचा व्हिडिओ तयार केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. 
 
पोलिसांना माहिती मिळाल्यावर पाची आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेने याबद्दल तक्रार दाखल केली होती की ती 26 मे रोजी आपल्या मित्रासोबत मंदिरात जात होती तेव्हा पाच जणांनी तिच्यासोबत दुष्कर्म केले असून आरोपींना याचा व्हिडिओ देखील काढला.
 
रविवारी पाची आरोपींविरुद्ध सामूहिक दुष्कर्म, मारहाण, छेडछाड आणि इतर कलम अंतर्गत मामला दाखल करण्यात आला आहे. आरोपी जीतेंद्र भाट (20), गोविंद भाट (20), दिनेश भाट (24) आणि महेश भाट (22) चौघांना अटक केली गेली आहे. तसेच पाचवा आरोपी संजय भाट फरार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रेंच ओपन क्वार्टर फायनलमध्ये नोवाक जोकोविच