Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार स्वतःच्या लग्नाला पोहोचले नाहीत, गुन्हा दाखल

आमदार स्वतःच्या लग्नाला पोहोचले नाहीत, गुन्हा दाखल
, रविवार, 19 जून 2022 (15:48 IST)
Case against MLA : स्वतःचं लग्नाचा उत्साह सर्वांनाच असतो. पण बिजू जनता दलाचे (BJD) आमदार विजय शंकर दास यांनी ओडिशात स्वतःच्या लग्नाला हजेरी लावली नाही. नवरी वाट पाहत राहिली. पण नवरदेव लग्नाला न पोहोचल्याने आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जगतसिंगपूर सदर पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून तिरतोल चे आमदार दास (30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्वासन देऊनही आमदार शुक्रवारी विवाह निबंधक कार्यालयात न आल्याचा आरोप महिलेने केला आहे
 
जगतसिंगपूर सदर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवाह साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आमदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, महिला आणि आमदाराने 17 मे रोजी विवाह निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, 30 दिवसांचा नियोजित कालावधी उलटूनही शुक्रवारी ही महिला तिच्या कुटुंबीयांसह लग्नाच्या औपचारिकतेसाठी तेथे पोहोचली, मात्र आमदार विजय शंकर दास फिरकलेच नाहीत.
 
आपण महिलेशी लग्न करण्यास नकार दिला नसून 60 दिवसांच्या आत आपण लग्नाची नोंदणी करू शकतो, असे आमदाराने म्हटले आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले, “लग्न नोंदणीसाठी अजून 60 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मी आलो नाही. मला त्यांनी किंवा इतर कोणीही विवाह निबंधकांच्या कार्यालयात जाण्यास सांगितले नाही. 
 
महिलेने दावा केला की ती दाससोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि ठरलेल्या तारखेला त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. महिलेने आरोप केला, "परंतु दुर्दैवाने त्यांचे भाऊ आणि इतर कुटुंबीय मला धमकावत आहेत. त्यांनी आपले वचन पाळले नाही आणि तो माझ्या फोन कॉलला उत्तर देत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत इमारतीच्या आगीत 14 जण अडकले, सर्वांची सुखरूप सुटका