Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी हे सर्वांत मोठे अभिनेते- औवेसी

मोदी हे सर्वांत मोठे अभिनेते- औवेसी
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (08:53 IST)
मोदी हे देशातील सर्वांत मोठे कलाकार आहेत. ते राजकारणात आले, नाहीतर फिल्म इंडस्ट्रीचं काय झालं असतं?, असं वक्तव्य एमआय़एम पक्षाचे नेते असदुद्दीन औवेसी यांनी केलं आहे
"शेती कायदे मागे घेतल्यानंतर आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिल्याचं मोदींनी म्हटलं. यावरूनच कळतं की मोदी किती मोठे कलाकार आहेत.
"या कायद्यांविरोधात 750 शेतकऱ्यांनी जीव दिला, तरीही ते जागेवरून हटले नाहीत. याला म्हणतात तपस्या. तुम्ही म्हणताय की माझ्याच तपस्येत कमतरता राहिली, कलाकार आहात तुम्ही," असंही औवेसी पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच शेती कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या कायद्यांविरोधात शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन