Publish Date: Fri, 27 Jun 2025 (20:54 IST)
Updated Date: Fri, 27 Jun 2025 (20:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून ५ देशांच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. या दरम्यान, ते ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेतही सहभागी होतील.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून ५ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यांचा दौरा २ जुलैपासून सुरू होऊ शकतो. मोदींचा हा पाच देशांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये, ते प्रथम ६ आणि ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील.
तसेच ब्राझीलव्यतिरिक्त, नरेंद्र मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, घाना आणि नामिबियालाही भेट देऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरनंतर हा मोदींचा पहिला पाच देशांचा दौरा असेल.
Edited By- Dhanashri Naik