Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

मोदींनी पदभार घेता शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीची 17 वा हफ्ता जारी केला

Pm modi
, सोमवार, 10 जून 2024 (16:30 IST)
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पंतप्रधान मोदींनी पदभार घेता पहिल्याच दिवशी शेतकरी सन्मान निधीच्या 17 वा हफ्ता जारी केला. 

त्यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला असून आज पदभार स्वीकारल्याचे पहिले चित्र समोर आले आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारता शेतकऱ्यांशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी 17 व्या हफ्त्याला मंजुरी दिली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 20 कोटी रुपये जाहीर केले. याचा फायदा 9.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात त्यांचे सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करेल.
 
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठकही आज होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकार सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप होऊ शकतात.
 
 मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाचा भाग असलेले राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांनी तिसऱ्या टर्ममध्येही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे राजकारणी ठरले आहेत.शपथविधी सोहळ्यात विविध राजकारणी, चित्रपट उद्योगाशी संबंधित लोक आणि उद्योगपतीही उपस्थित होते. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NEET परीक्षेच्या निकालाचा वाद काय आहे? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थी का करतायत?