भारत व पाकिस्तान सीमेवर संवेदनशील परिस्थिती बनली असून तणाव निर्माण झाला आहे. याबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एका कार्यक्रमाला हजेर होते, कार्यक्रम सुरु असताना मोदींना एक चिठ्ठी आणून देण्यात आली. त्यांनी लगेच भाषण थांबवून चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर भाषण सोडून ते त्वरित तेथून निघून गेले आहेत. नरेंद्र मोदी हे उच्चस्तरीय बैठकीसाठीच रवाना झाले असावे असा अंदाज लावण्यात येतोय.
पाकिस्तानच्या वायूसेनेकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्यात आल्यानंतर दिल्लीतील हालचालींना वेग आला होता, केंद्रीय गृहमंत्रालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मोदींच्या निवासस्थानीही बैठक झाली आहे. राजधानीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमाला मोदीं प्रमुख पाहुणे होते, एअर स्ट्राईकनंतरचा हा मोदींचा पहिलाच सरकारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जाताच मोदी-मोदीचे नारे लावण्यात आले. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंहही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र मोदीना चिट्ठी मिळताच ते निघून गेले आहेत. त्यामुळे चर्चा सुरु झाली असून भारत मोठी कारवाई करणार का असे देखील विचार समोर येत आहेत.