Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदींनी दिली शेतकऱ्यांना मोठी भेट, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

Narendra Modi
, बुधवार, 28 मे 2025 (16:24 IST)
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत निश्चित करताना, पंतप्रधानांनी खर्चापेक्षा ५०% जास्त किमान आधारभूत किंमत मंजूर केली.
 
मिळालेल्या माहितनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करताना, पंतप्रधानांनी खर्चापेक्षा ५०% जास्त किमान आधारभूत किंमत मंजूर केली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी कर्जात व्याजात सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने धान, कापूस, सोयाबीन, तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे.  
नवीन किमान आधारभूत किंमत सरकारवर २ लाख ७ हजार कोटी रुपयांचा भार टाकेल. मागील हंगामाच्या तुलनेत हा ७ हजार कोटी रुपये जास्त आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की, किमान आधारभूत किंमत पिकाच्या खर्चापेक्षा किमान ५०% जास्त असेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, या शेअर्सना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले