भिंड- मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्याच्या मेहगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन यांनी म्हटले की मुलगा असो वा मुलगी शिक्षण आवश्यक आहे, शिक्षेमुळे समाज उन्नती करतं.
श्रीमती जशोदा बेन येथे राठौर समाजाच्या सामूहिक विवाह आयोजनात आशीर्वाद देण्यासाठी पोहचली होती. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ अशोक मोदी पण होते.
या दरम्यान जेव्हा त्यांच्याशी पंतप्रधानांबद्दल चर्चा केली गेली तर त्यांनी म्हटले की मोदींनी खूप प्रगती करावी आणि देशाचे राष्ट्रपती व्हावे. या दरम्यान अशोक मोदी यांनी म्हटले की मोदी माझे मेहुणे आहेत आणि देशाची सेवा करायची म्हणून आमच्यासोबत नाही. बहिणीचं लग्न झालं तेव्हा ते गुजरातमध्ये पक्षाचे संगठन मंत्री होते. लग्नानंतर बहीण शिक्षक बनून विद्यार्थ्यांची तर मोदींनी देशाची सेवा करत आहे. त्यांनी पंतप्रधान आणि आपल्या बहिणीला त्याग मूर्ती आणि देवात्मा असल्याचे म्हणून कौतुक केले.
येथे आयोजित सामूहिक विवाह संमेलनात 28 जोडपे विवाह बंधनात अडकले.