International Women's Day: महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहे. आज पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ३ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती असेल. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे.
तसेच आज महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहे. सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, महिला दिनानिमित्त आम्ही आपल्या स्त्री शक्तीला सलाम करतो. आमच्या सरकारने नेहमीच महिलांना सक्षम बनवण्यासाठी काम केले आहे, जे आमच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येते. आज, वचन दिल्याप्रमाणे, माझ्या सोशल मीडिया प्रॉपर्टीज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून हाताळल्या जातील. या संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील नवसारी येथे लखपती दीदी कार्यक्रमाला संबोधित करतील. या काळात महिला शक्तीबद्दल एक अभिमानास्पद क्षण पाहायला मिळेल.
पंतप्रधान मोदींना ३ हजार महिला सुरक्षा पुरवणार
मिळालेल्या माहितीनुसार महिला दिनानिमित्त, फक्त महिला पोलिस कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुरक्षा देतील. म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर असेल. देशात पहिल्यांदाच महिला पोलिस कर्मचारी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारतील. गुजरातच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरात पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती असणार आहे. नवसारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनापासून ते कार्यक्रम स्थळाच्या सुरक्षेपर्यंतची जबाबदारी फक्त महिला पोलिस कर्मचाऱ्यांची असेल.
Edited By- Dhanashri Naik