Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार

मोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार
, मंगळवार, 4 जुलै 2017 (12:02 IST)

गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे. त्या चहाच्या टपरीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वडनगरमधील  चहाच्या टपरीला आता लवकरच नवं रूप मिळणार आहे. यामुळे गुजरातमध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या नव्या स्थळाची भर पडणार आहे. 

 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी प्रचाराच्यावेळी लहानपणी ते विकत असलेला चहा आणि चहाची टपरी या सगळ्या आठवणी जागविल्या होत्या. 'गुजरातमधील वडनगर रेल्वेस्थानकात एक चहाची टपरी असून, लहानपणी याच चहाच्या टपरीवर नरेंद्र मोदी हे चहाविक्री करत होते, असं सांगितलं जातं. ही टपरी पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी दिली. रविवारी गांधीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमुक्तसाठी विठ्ठलाकडे साकडे