Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रपूर आदिवासी आश्रमशाळेतील माऊंट एव्हरेस्ट सर केले

mount everest
, बुधवार, 16 मे 2018 (15:58 IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील १० आदिवासी विद्यार्थी महिन्याभरापूर्वी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मढावी, परमेश आले, मनिषा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा जिवती येथील कवीदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्हयाची मान अभिमानाने उंच केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याची किर्ती राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. मिशन शौर्य हा उपक्रम आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आहे. या १० विद्यार्थ्यांपैकी आणखी २ विद्यार्थी येत्या २ दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहू काल संपल्यानंतर भाजपच्या हाती लागू शकते सत्ता