Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनप्रयागमध्ये डोंगर कोसळला, भाविक बचावले

सोनप्रयागमध्ये डोंगर कोसळला, भाविक बचावले
, शनिवार, 27 जुलै 2024 (17:31 IST)
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यात पाऊसामुळे भुस्खनल सुरु आहे. सोनप्रयाग केदारनाथच्या अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर डोंगर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र भाविकांमध्ये घबराहट पसरली.
 
सध्या या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे डोंगर कोसळण्याची घटना सामान्य आहे. 
या घटनेमुळे स्थानिक प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.सध्या पाऊस असून देखील लोक चारधाम यात्रेसाठी जात आहे. प्रशासनाने उत्तराखंड जाणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. खराब हवामानात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवाशांनी आणि पर्यटकांनी डोंगरात भागात अडकल्यास मदतीसाठी तातडीनं स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा निवडणुकीपूर्व अजित पवारांना मोठा धक्का, हे नेते करणार शरद पवार गटात प्रवेश