Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोगली गर्ल गतिमंद नाही तर बुध्दिमान

मोगली गर्ल गतिमंद नाही तर बुध्दिमान
लखनौ- उत्तर प्रदेशात जंगलात माकडांसोबत सापडलेली मोगली गर्ल माणसाळतेय. ती गतिमंद नाही, उलट आत्मसात करण्याची तिची क्षमता जास्त आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एका एनजीओच्या माध्यामातून तिला घरही मिळाले आहे.
 
उत्तर प्रदेशातल्या बहारिच वनक्षेत्रातल्या कटर्निया घाटात ती माकडांसोबत सापडली होती. रूग्णालयात तिच्या जखमांवर उपचार झाल्यानंतर आता ती लखनौमधील गतिमंद मुलांच्या निर्वाण हॉस्पिटल या एनजीओच्या आधारगृहात आहे. सध्या ती ताप आणि कुपोषणाशी झगडतेय. या आधारगृहाचे संस्थापक सुरेश सिंग धापोला यांनी तिला एहसास हे नाव दिले आहे. गेल्या 2 महिन्यात एहसासमध्ये खूपच बदल झाले आहे.
 
आता ती खायला हवं असेल तर दाना असा शब्द उच्चारते, खुणेने पाणी मागते. प्रात: विधींसाठी कपडे काढायचे असतात हे तिला माहित झाले. ती गोष्टी पाहून तशीच कृती करते. त्यामुळे ती गतिमंद नाही, केवळ माणासारखे वागणे विसरली आहे, धापोला सांगतात.
 
तिची काळजी घेणार्‍या आणि तिच्या प्रशिक्षक इशा श्रीवास्तव म्हणाल्या, माणसाचा सहवास न लाभल्याने तिला ज्ञानेंद्रियांशी संबंधित समस्या आहेत. ती तिचे हात-पाय सतत झटकत असते. तिला काही नको असेल तर किंचाळते, दमली असेल लहान मुलांसारखी रांगते. अनोळखी व्यक्तींना घाबरते. अन्या मुलांसोबत येथे राहून तिच्यात हळूहळू बदल होत आहेत. पहिल्या दिवशी ती अन्नाला स्पर्शही करत नव्हती, पण आता ज्यूस, दूध भाज्या खाते. तिचे अन्नाचे प्रमाण वाढवल्याने आता ती कोणाच्या मदतीविना चालू शकते, अधूनमधून हसतेही, धापोला सांगत होते.
 
केंद्र सरकारच्या नॅशनल इन्सिटट्यूट ऑफ पब्लिक को-ऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचे उपसंचालक डॉ. व्ही. डी. गडकर यांनी तिला तपासल्यावर ती गतिमंद किंवा ऑटिस्टिक असण्याची शक्यता धुडकावून लावली आहे.
 
तिचे काही वागणे प्राण्यांसारखे आहे, असे त्यांनी तिचे निरीक्षण केल्यावर सांगितले. तिच्यासंदर्भातले वृत्त प्रसारमाध्यमातून वार्‍यासारखे पसरल्यावर तिला घर, आसरा देऊ करणारे अनेक जण पुढे येत आहेत. दोन पुरूष तिचे आजोबा आणि काका असल्याचे सांगत आले होते, पण त्यांना आपले नाते नीट पटवून सांगता आले नाही, असे धापोला म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काळया पैशांसाठी आतापर्यंत 38 हजार ईमेल आले