Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mukesh Ambani : मुकेश अंबानी झाले आजोबा, श्लोकाने गोंडस मुलीला जन्म दिला

mukesh ambani
, बुधवार, 31 मे 2023 (18:40 IST)
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले. आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. यावेळी त्यांच्या घरी एक गोंडस मुलगी आली आहे. दोघांना पृथ्वी आकाश अंबानी हा मुलगा असून तो अवघ्या दोन वर्षांचा आहे. बाळाच्या आगमनाने संपूर्ण अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी श्लोका आणि आकाश सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुकेश अंबानी आणि पृथ्वीही दिसले.आकाश आणि श्लोका हायस्कूलपासून एकमेकांना ओळखतात. आकाश आणि श्लोका यांची मार्च 2018 मध्ये एंगेजमेंट झाली. डिसेंबर 2019 मध्ये विवाहबंधनात अडकले.श्लोकाने 2021 साली पहिल्या मुलाला पृथ्वीला जन्म दिला. आकाश आणि श्लोका दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहे. अंबानी कुटुंबात आनंदच वातावरण आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर', अशी असते शहराचं नाव बदलण्याची प्रक्रिया