Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसामच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज यांची भेट

आसामच्या  महिला शिष्टमंडळाने घेतली राज यांची भेट
, शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:36 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट घेतली. आसाममध्येही यूपी-बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची समस्या मांडून, या समस्येवर मार्गदर्शनाची विनंती या महिलांनी राज ठाकरेंना केली.
 

दादरमधील ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आसामच्या महिलांनी त्यांची भेट घेतली. आसाममधील ‘स्वाधीन स्त्री शक्ती’ असे या महिला संघटनेचं नाव आहे.

आसामाच्या महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं. महाराष्ट्राप्रमाणेच आसाममध्येही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे तेथील भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. हीच स्थिती महाराष्ट्रात आहे आणि इथे राज ठाकरे कायम आवाज उठवत असतात. त्यामुळे आसाममधील महिलांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whats App वरून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवा