जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतातील खून प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. पण प्रेम प्रकरणातील खून प्रकरणात मात्र 28 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) ने दिली आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, वर्ष 2001 ते 2017 दरम्यान सर्वाधिक खून हे प्रेम प्रकरणातून झाले आहेत. या दरम्यान 28 टक्क्यांची (44,412) वाढ झाली आहे. तसेच प्रेम प्रकरणातून होणाऱ्या खुनांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेश हे पहिल्या स्थानावर आहेत. तर दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशातील केरळ आणि पश्चिम बंगाल सोडले, तर इतर सर्व राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रेम प्रकरणामुळे सर्वात कमी खून झाले आहेत. त्यामुळे हे राज्य पाचव्या स्थानावर आहेत.
“सर्वाधिक खून प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधामुळे झाले आहेत. याशिवाय 2017 मध्ये ऑनर किलिंगचे 92 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 2016 मध्ये 71 गुन्हे दाखल झाले होते. यामध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणणं आहे.