दिल्लीत रविवारी झालेल्या हृदयद्रावक घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुलतानपुरी परिसरात रविवारी एका 20 वर्षीय तरुणीच्या स्कूटीला कारने धडक दिली. कारमध्ये अडकलेला तिचा मृतदेह सुमारे 4 किमीपर्यंत ओढून नेण्यात आला.
यावेळी मुलीचे शरीर पूर्णपणे नग्न होते. या प्रकरणी पोलिसांनी कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. यासोबतच मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार दिल्ली पोलिसांचा निष्काळजीपणाही समोर आला आहे.
या संपूर्ण घटनेत दिल्ली पोलिसांचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महिलेच्या मृत्यूच्या एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, त्यानेपीसीआर व्हॅनमध्ये पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिस कर्मचारी होशमध्ये नव्हते. पोलिसांनीही कारवाई करण्यात रस दाखवला नाही. दीपकने दावा केला की, पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास तो दुधाची डिलिव्हरी घेण्यासाठी थांबला होता तेव्हा त्याने कार महिलेला ओढत असल्याचे पाहिले.
प्रत्यक्षदर्शी दीपकने मीडियाला सांगितले की, कार सामान्य वेगाने जात होती आणि चालक शुद्धीत दिसत होता. दीपकने दावा केला की तो बेगमपूरपर्यंत बलेनो कारचा पाठलाग करत होता. पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावाही दीपकने केला.
रोहिणी जिल्ह्यातील कांजवल पोलिसांनी दावा केला की त्यांना रविवारी पहाटे 3.30 वाजता एक कॉल आला ज्यामध्ये कॉलरने सांगितले की एक राखाडी रंगाची बलेनो कार एका महिलेचा मृतदेह कुतुबगढच्या दिशेने ओढत आहे. फोन करणाऱ्याने पोलिसांना गाडीचा नोंदणी क्रमांक सांगितला.
पोलिसांनी कार मालकासह पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भरधाव वेगात जाणे आणि निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत होणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.