आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के पेक्षा अधिक जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे .
देशातील जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णयावर जनतेचा कौल मागितला आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांनी आपला निर्णय चूक आहे की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी अॅपवरील एका सर्व्हेत लोकांना सहभागी व्हायचं आवाहन केलं होत.. यामध्ये जनतेला 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. या सर्व्हेतून समोर आलेले निष्कर्ष खु्द्द पंतप्रधानांनी ट्विट केले आहेत. त्यामुळे आता स्वतः जनतेने पाठींबा दिला असल्याने आणि तो पुरावा असल्याने विरोधकांचे तोड आपोआप बंद होईल असे चित्र सध्या आहे.