rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी माझी – मोदी

narendra modi
नवी दिल्ली , शनिवार, 10 डिसेंबर 2016 (11:03 IST)
नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयानंतर निर्माण होणार्या परिस्थितीची कल्पना होती. नोकरदारवर्गाला पगार काढताना त्रास होणार, उद्योगधंद्यांवर परिणाम होणार, या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना पंतप्रधानांना होती. मात्र, तरीही पंतप्रधान त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले, असे वृत्त दिले आहे. `मी सर्व संशोधन केले आहे. नोटाबंदीचा निर्णय फसल्यास, त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर असेल,’ असे पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटले होते. या बैठकीत सहभागी झालेल्या तीन मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना स्वतःची लोकप्रियता पणाला लावल्याचे वृत्त आहे.
 
नोटाबंदीच्या मोठय़ा निर्णयात पंतप्रधान मोदींनी काही नोकरशहांना सहभागी करुन घेतले होते. भारतीय अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नसलेल्या काही विश्वासू लोकांसोबत चर्चा करुन मोदींनी हा नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या निर्णयावर काम करणार्या लोकांना हा निर्णय जाहीर करण्याआधी कोणालाही न सांगण्याचे आदेश देण्यात आले होते. मोदी सरकारच्या मोठय़ा निर्णयात काही तरुण अभ्यासकांनीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तरुण अभ्यासकांची ही टीम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी नोटाबंदीच्या निर्णयाची तयारी करत होती. नोटबंदीचा निर्णय अतिशय गोपनीय ठेवण्याची जबाबदारी या टिमवर होती.
 
नोटाबंदीच्या निर्णयासाठी काम करणार्या टिममध्ये वरिष्ठ पदावर काम करणार्या हसमुख अढिया यांचा समावेश होता. 58 वर्षीय अढिया पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले आहे. हसमुख अढिया यांच्याकडे 2015 मध्ये महसूल सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांना सहकार्य करण्याचे काम अढियांकडे देण्यात आले होते. मात्र तरीही अढिया यांना थेट मोदींना संपर्क साधण्याचे अधिकार देण्यात आले होते.
 
नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला असला तरी या निर्णयाची थोडीफार कल्पना देणार्या घटना मध्यंतरीच्या काळात घडल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही विश्लेषकांनी अधिक रकमेच्या नोटा बंद केल्या जाऊ शकतील, असे म्हटले होते. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात नव्या सिरीजच्या नोटा बदलणार असल्याचे सांगितले होते. ऑगस्टमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या डिझाईनला मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये दोन हजाराच्या नोटांच्या छपाईला सुरुवात झाली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अॅट्रोसिटी कायद्या बदल शक्य नाही - मुख्यमंत्री