Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2030 पर्यंत भारत विज्ञानात टॉप थ्री मध्ये

2030 पर्यंत भारत विज्ञानात टॉप थ्री मध्ये
तिरुपती , बुधवार, 4 जानेवारी 2017 (11:02 IST)
श्री व्यंकटेश्वर विश्वविद्यालयामध्ये पाचदिवसीय वार्षिक भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती येथे बोलताना म्हटले, '2030 पर्यंत भारत जगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात टॉप थ्री देशात जाईल. 
 
भारताच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीच्या सर्व संस्थांना संबधित घटकांशी जोडण्याची गरज आहे.त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांना या संस्थांशी जोडणे ही काळाची गरज आहे. नवीन कल्पना आणि स सृजनशीतला यांचे बीजारोपण हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये करणे गरजेचे तरच भारताचे भविष्य सुरक्षित होईल.'  यासबर भौतिक प्रणाली ही एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. ही एक रोबोटिक्स, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, डाटा अॅनालिसिस, क्वॉन्टम कम्युनिकेशन, डीप लर्निंग आणि इंटरनेट यासाठी मोठी संधी आहे. आज जर आम्ही लोकांमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली तर आम्हाला उद्याचे तज्ज्ञ मिळतील. वैज्ञानिकांच्या दृष्टी, कष्ट आणि नेतृत्त्वावर देशाला नेहमीच अभिमान  आहे. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून समाजाला सक्षम बनवले आहे. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. धोरणात्मक प्रक्रियेमध्ये शास्थज्ञांनी मोठे योगदान दिले आहे, असेही मोदी म्हणाले. 
 
सेवा उद्योग क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान विकासाची गरज आहे. मूलभूत विज्ञानाचे व्यवहारी विज्ञानात करण्यासाठी सरकार म्हणून हवी ती मदत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मोदी यांनी याप्रसंगी दिले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिलिंडरचे पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट