Publish Date: Wed, 08 Feb 2017 (08:53 IST)
Updated Date: Wed, 08 Feb 2017 (08:55 IST)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. भाषणाच्या सुरूवातीस त्यांनी सोमवारी रात्री दिल्ली येथे झालेल्या भूकंपाबद्दल संवेदना व्यक्त करत अखेर भूकंप झालाच असे म्हणत, यामागे काहीतरी कारण असेल असे म्हणत प्रारंभीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. भाषणात मोदींनी सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदीसह त्यांच्या सरकारने सामान्य माणसांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा यशाची माहिती दिली. काँग्रेसचे नेते मल्लिकर्जून खरगे यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला उत्तर देत देशाला कुणा एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचा त्याग केला आहे. परंतु यांच्या तोंडून कधी भगत सिंग किंवा चंद्रशेखर आझाद यांचे नाव कसं काय निघत नाही, असा सवाल केला.