Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सौभाग्य’ या मोठ्या योजनेची घोषणा

सौभाग्य’ या मोठ्या योजनेची घोषणा
, मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:24 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘सौभाग्य’ या एका मोठ्या योजनेची घोषणा केली. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकार सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार आहे. जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे. 16 हजार 320 कोटींची ही योजना आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओदिशा या राज्यातल्या जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत 5 एलईडी बल्ब, पंखा आणि सोलार पॉवर पॅक वाटले जाणार आहेत.

पंडित दिनदयाळ यांच्या नावानं पंतप्रधान मोदी ‘सौभाग्य’ ही मोठी योजना जाहीर केली आहे. 

या योजनेत 8 प्रमुख गोष्टींवर भर 

 

– प्रत्येक घरी वीज

– शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा

– रॉकेलला पर्यायी वस्तू उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

– आरोग्य क्षेत्रात सुधारणा

– कम्युनिकेशन क्षेत्रात सुधारणा

– सार्वजनिक सुरक्षेत सुधारणा

– रोजगाराच्या संधी वाढवणार

– जीवनशैली उंचवण्याचा प्रयत्न, विशेषत: महिलांसाठी


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा मृत्यू