आज संध्याकाळी 7.15 वाजता भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे.
बांगलादेश, श्रीलंका, भूतान, सेशेल्स, नेपाळ, मॉरिशस आणि मालदीवच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
शपथविधीला जाण्याआधी आज सकाळी नरेंद्र मोदींनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि आज एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल.
या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष हे भाजप व्यतिरिक्त प्रमुख पक्ष आहेत.