rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अब की बार, भुमिपूजनवाली सरकार – नवाब मलिक

nawab malik
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (08:50 IST)
शिवस्मारकाच्या भुमिपूजनाविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजप सरकार हे भूमिपूजन सरकार आहे. आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे विविध प्रकल्पांची उद्घाटने केली जात आहेत. भाजपने नेहमीच रामाच्या नावाचा उपयोग केला आहे, ओशिवरा स्टेशनला राम मंदिर नाव देऊन लोकांना भावनिक करण्याचे काम भाजप करत आहेत. बिहारच्या निवडणूकीवेळी भाजपने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. स्मारकाचे काम, आराखडा अद्यापही मंजूर नाही. असे असताना शिवस्मारकाच्या भुमिपूजनाची घाई ही आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे, हे स्पष्ट आहे.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे  यांना चिक्की घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट देण्याचे महान कार्य केले आहे. यावर खुलासा करताना Anti-Corruption Bureau Maharashtra ने थातूरमातूर स्पष्टीकरण दिले. एसीबीची जबाबदारी चौकशी करण्याची असतानाही त्यांनी कोणतीही चौकशी न करता पंकजा मुंडे यांना क्लीनचिट दिली. एसीबीवर मुख्यमंत्र्यांचा दबाब आहे हे स्पष्ट दिसते. सरकारच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी मुंडे यांना क्लीनचीट देण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 
 
यावेळी नवाब मलिक म्हणाले की महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी जो अहवाल सादर केला होता त्याच आधारावर पंकजा मुंडे यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणात एसीबीने मंत्र्याचा जबाब नोंदवला नाही, कोणत्याही अधिकाऱ्याची, कंत्राटदाराची चौकशी केली नाही, अधिकाऱ्यांचे बँक अकाऊंटही तपासले नाहीत. चिक्की घोटाळ्याप्रकरणी सात जानेवारीला अंतिम सुनावणी असून आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धाड पडली आणि तरुण मेला