Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नक्षली हल्यात 25 जवान शहीद

नक्षली हल्यात 25 जवान शहीद
, मंगळवार, 25 एप्रिल 2017 (06:45 IST)
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांची संख्या वाढून सीआरपीएफचे 25 झाली आहे. तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. 

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या बटालियनमध्ये 90 जवान होते. यात जखमी झालेल्या जवानांना रायपूरच्या रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

सुकमातील चिंतागुफामध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु होतं. तेथील कामगारांना साहित्य पोहोचवण्यासाठी जवान निघाले होते. दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारही पळवली आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बनावट पासपोर्ट प्रकरण : छोटा राजनसह चार जण दोषी