rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू ; ‘हे’आहे कारण

NCB witness Prabhakar Sail dies in Aryan Khan drugs case; This is because
, शनिवार, 2 एप्रिल 2022 (15:24 IST)
कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला (Aaryan Khan) अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे  साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल(शुक्रवार) मृत्यू झाला आहे. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती.
किरण गोसावीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी म्हटले होते.
 
दरम्यान तसेच या प्रकरणातील गौप्यस्फोट करताना पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचे फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहरातून तीन मुलींचे अपहरण