Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवे संशोधन, गुगल पेशंटच्या मृत्यूचा अंदाज बांधणार

नवे संशोधन, गुगल पेशंटच्या मृत्यूचा अंदाज बांधणार
, बुधवार, 20 जून 2018 (16:54 IST)
अंथरुणाला खिळलेला किंवा उपचार घेत असलेला पेशंटची प्राणज्योत कधी मालवू शकेल, हे सांगणारं सॉफ्टवेअर गुगलने विकसित केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. याबाबतचा एक प्रयोग गुगलने यशस्वी केला असून त्याचा रिपोर्ट नुकतंच प्रसिद्ध झाला आहे. गुगलची सहयोगी
कंपनी अल्फाबेट याबाबतचा संशोधन प्रकल्प राबवत आहे. गुगलच्या या संशोधनाला यश मिळालं तर विज्ञानक्षेत्रासाठी हा शोध खूप महत्वाचा ठरणार आहे. स्टॅनफोर्ड युनव्हर्सिटीच्या मदतीनं गुगल हा प्रकल्प राबवत आहे.  
 
गुगलची मेडिकल 'ब्रेन टीम' कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) सहाय्याने हे खास सॉफ्टवेअर विकसित करत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये पेशंटची सर्व माहिती भरली जाते. पेशंटच्या मेडिकल टेस्ट, त्याचा आजारपणाचा माहिती, डॉक्टरांचा सर्व तपशील, अशी सर्व माहिती भरली जाते. या माहितीच्या आधारे गुगल विश्लेषण करून त्या पेशंटच्या मृत्यूचा कालावधी काय असेल त्याचा अंदाज बांधणार आहे.

या संशोधनाचा प्रयोग एका कॅन्सरग्रस्त महिलेवर करण्यात आला. या महिलेला स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले. त्यानंतर गुगलनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर महिलेची जगण्याची शक्यता 19.9 टक्के असल्याचं सांगितलं आणि 10 दिवसातच त्या महिलेचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त