Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

नीता अंबानींनी मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्मन्स दिला

Nita Ambani performed
, सोमवार, 4 मार्च 2024 (12:45 IST)
नीता अंबानी यांनी 3 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात 'विश्वंभरी स्तुती' वर नेत्रदीपक नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फेस्टिव्हलमध्ये तीन दिवसांच्या कालावधीत पाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी प्रथमच जामनगरमध्ये 160 आंतरराष्ट्रीय विमानांमधून विदेशी पाहुणे आले होते.नीता अंबानी यांनी 'विश्वंभरी स्तुती' वर नृत्य सादर करून परंपरा साजरी केली, शक्ती आणि सामर्थ्याचे मूर्तिमंत मूर्ति माता अंबे यांना समर्पित एक पवित्र भक्तीगीत. त्यांचा नृत्य अतिशय सुंदर होता.या शानदार परफार्मेन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून काही तासांत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. 
नीता अंबानी लहानपणापासून प्रत्येक नवरात्रीला 'विशंभरी स्तुती' ऐकत आहेत. त्यांनी  भक्तीभावाने नृत्याचे सादरीकरण केले आणि अनंत आणि राधिकाच्या प्रवासासाठी माँ अंबेचे आशीर्वाद मागितले. परंपरा आणि अध्यात्माचा एक मार्मिक मिलाफ. नीता अंबानी यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा, विश्वंभरी स्तुतीच्या मंत्रमुग्ध सादरीकरणासह,आई अंबे यांना समर्पित केला . 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिबट्याचे डोके हंड्यात अडकलं, वनविभागाने 5 तासांच्या प्रयत्नानंतर वाचवले, पाहा व्हिडिओ