Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

मराठा मोर्चे फडणवीसांविरुद्ध नाहीत - गडकरी

nitin gadkari
नवी दिल्ली , शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:31 IST)
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीसाठक्ष मराठा समाजाचे निघालेले मोर्चे देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध नसल्याची टिप्पटी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या एकाही मोर्चामध्ये 'मुख्यमंत्री मुर्दाबाद'च्या घोषणा झालेल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 
मराठा मोर्चानी महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून काढले असताना महाराष्ट्रातील राजकारणातील प्रभावी नेते असलेल्या गडकरींनी त्याबद्दल आतापर्यंत पूर्णपणे मौन बाळगलेले आहे. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथमच त्रोटक स्वरूपात का होईना आपले मौन सोडले आहे. मोर्चे राज्य सरकारविरुद्ध नसल्याची गडकरींची टिप्पणी राजकीयदृष्टया महत्त्वाची आहे. ब्राह्मण असल्याच्या एका कारणावरून मला मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी नुकतेच केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन