केंदीय मंत्री नितीन गडकरींवर याची स्तुती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा आधुनिक श्रावणबाळ असा उल्लेख केला आहे. 'जुन्या काळात आई-वडिलांना यात्रेसाठी घेऊन जाणा-या श्रावणबाळाची ज्याप्रमाणे आठवण काढली जायची. त्याप्रमाणे आधुनिक काळात केदारनाथ, बद्रिनाथची यात्रा सुखरुप होईल तेव्हा लोक सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरींची आठवण काढतील', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. चारधामसाठी बांधण्यात येणा-या रस्त्यांमुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल', असंही नरेंद्र मोदी बोलले आहेत. उत्तराखंडमधील परिवर्तन रॅलीत ते बोलत होते.