बिहारमध्ये आज महाआघाडीचे सरकार तुटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. नितीश कुमार म्हणाले की, महाआघाडीसोबत राहणे आता कठीण झाले आहे. त्याचवेळी पीएम मोदींनीही नितीश कुमार यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर RJD सुद्धा सतत बैठका बोलवत आहे. सरकार वाचवण्यासाठी आरजेडी जीतन राम मांझी यांना मोठी ऑफर देऊ शकते, अशीही माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती येणे बाकी आहे. तत्पूर्वी काल तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत मौन तोडले होते. आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा आदर करतो आणि भविष्यातही त्यांचा आदर करत राहू, असे ते म्हणाले होते.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी संतापले आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि पंतप्रधान मोदींनी बिहारच्या जनतेची माफी मागावी, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. या सर्वांनी आपापल्या पक्षांची आश्वासने आणि विचारसरणी देऊन जनतेची फसवणूक केली आहे. यामध्ये नितीश कुमार यांची सर्वात मोठी भूमिका आहे. एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की कालपर्यंत नितीश कुमार म्हणत होते की ओवेसी (भाजपची) बी टीम आहे.
बिहारमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होत आहे. नितीश कुमार यांच्यासह सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नितीश कुमार आणि भाजपने राज्यात सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर पाटणा, बिहारमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
जेपी नड्डा बिहारला रवाना झाले आहेत. बिहारमध्ये संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे. यावेळी, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.