सध्या समुद्र किनारी भागात मासेमारीचा सिझन सुरू झाला आणि आता तर जवळपास 15 दिवस उलटले आहेत. मात्र यामध्ये मांसाहरी खवय्यांच्या आवडीचा पापलेट हा मासा बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र मासेमारीच्या पहिल्या फेरीत या माशाची मिळकत अर्थ्या पेक्षा कमी झाली आहे. त्याचप्रमाणे या माशाच्या दरामध्ये घसरण झाल्याने मच्छीमार चिंतेत सापडले आहेत. समुद्रात एकतर मासा मिळत नाही आणि मिळाला तर दर कमी यामुळे मासेमार करणारे संकटात सापडले आहे. मान्सून जेव्हा संपत आला तेव्हा खोल समुदारात जाऊन 1 ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठवण्यात आली. तरीही खराब हवामानामुळे प्रत्यक्षात 12 आणि 13 ऑगस्टनंतर मासेमारी बोटी समुद्रात गेल्या होत्या. मासेमारीच्या पहिल्या फेरीमध्ये सातपाटी-मुरबा भागातील मच्छीमार गिलनेट पद्धतीच्या जाळ्यांद्वारे पापलेटची मासेमारी करत असून सातपाटी येथील बहुतांश बोटींना पहिल्या फेरीत जेमतेम 200 ते 300 किलो पापलेट हाती लागले. यापूर्वीच्या मासेमारी हंगामात पहिल्या काही फेऱ्यांमध्ये किमान एक टन पापलेटची मासेमारी करत असत. पापलेटची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी येत्या काही फेऱ्यांमध्ये हा खवय्यांच्या आवडीचा मासा किती प्रमाणात हाती लागणार याबद्दल चिंता आहे.