Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता फक्त ५ हजारापर्यंतची जुन्या नोटांची रक्कम जमा करता येणार

आता फक्त ५ हजारापर्यंतची जुन्या नोटांची रक्कम जमा करता येणार
, सोमवार, 19 डिसेंबर 2016 (16:58 IST)
केंद्र सरकारकडून धक्का देणारी नवीन घोषणा करण्यात आली आहे. यात जुन्या चलनातील नोटा कितीही असल्या तरी फक्त पाच हजारापर्यंतची रक्कमच बँकेत जमा करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती स्वीकारली जाणार नाही.  याआधी चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र 30 डिसेंबरला काही दिवस शिल्लक बाकी असतांना अशाप्रकारची घोषणा करण्यात आली आहे. अनेक लोक करंट अकाऊंटमध्ये काळा पैसा जमा करुन पांढरा करत असल्याचं समोर आल्यानंतर ही घोषणा केली आहे.हा नियम फक्त जुन्या नोटांपुरता असून नव्या नोटा असतील तर तुम्ही कितीही रक्कम खात्यात जमा करु शकता येणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाणे: चोराने गिळली सोन्याची चेन, पोलिसाने करवली पॉटी