Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटा पोहचविण्यासाठी वायुसेनेची मदत

नोटा पोहचविण्यासाठी वायुसेनेची मदत
बँकांमधील चलनाच्या तुटवड्यामुळे देशभरात निर्माण झाले्लया परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन नोटा बँकांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय वायूदलाची मदत घेण्यात येत आहे. सध्या नाशिकच्या सिक्युरिटी प्रसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. आठवड्याभरात नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारची योजना आहे.
 
या छपाईखान्यातून 50 कोटीच्या 500 रूपयांच्या नोटांचा पुरवठा केल्यानंतर आता 50 आणि 100 रूपयांच्या सुमारे 35 लाख नोटा छापून तयार झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच नोटांचा तुटवडा दूर होणार आहे.
 
हवाई दलाचे ग्लोबलमस्टर हे विमान आणि हेलिकॉप्टर्स नोटांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहे. आतापर्यंत झारखंडसह देशातील अन्य ठिकाणी विमानाने नोटा पा‍ठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत देशभरात बँकामधील चलनाचा तुटवडा संपुष्टात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा