बिहारच्या सुपौल येथे एका शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. येथे नर्सरीत शिकणाऱ्या एका चिमुकल्याने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गोळी झाडली. हा चिमुकला आपल्या बॅगेत बंदूक घेऊन आला होता. त्याच्या बॅगेत बंदूक पाहून शिक्षक चक्रावले. या गोळीबारात आसिफ नावाच्या मुलाच्या डाव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरु आहे.
सदर प्रकार बिहारच्या सुपौलच्या त्रिवेणीगंजच्या लालपट्टीयेथील एका शाळेत घडला आहे. नर्सरीत शिकणाऱ्या एकलव्य नावाच्या चिमुकल्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या आसिफवर गोळी झाडली. त्यात आसिफ च्या डाव्या हाताला गोळी लागली असून तो जखमी झाला. एकलव्य हा शाळेच्या दफ्तरात बंदूक घेऊन आला होता.
हा प्रकार घडतातच शाळा प्रशासन सक्रिय झाले असून पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून या चिमुकल्याच्या बॅगेत ही पिस्तूल आली कशी शाळा प्रशासनाकडून हा निष्काळजीपणा कसा झाला. ते मुलांचे दफतर तपासत का नाही तसेच पालकांसाठी ही घटना काळजी करण्यासारखी आहे. अखेर चिमुकल्याच्या बॅगेत पिस्तूल कशी आली? पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जेणे करून भविष्यात अशी घटना घडू नये. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे.