Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

नवे मुख्य निवडणूक आयुक्त, 'ओम प्रकाश रावत'

om-prakash-rawat-appointed-as-new-chief-election-commissioner-of-india
, सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:51 IST)
सध्या निवडणूक आयुक्त असलेले ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती पदमुक्त होत आहेत. त्यांच्या जागी ओम प्रकाश रावत पदभार स्वीकारतील.

ओम प्रकाश रावत हे 1977 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. देशाचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ऑगस्ट 2015 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, मात्र कुंचल्याच्या साहाय्याने