Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा एकदा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार

पुन्हा एकदा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार
, शनिवार, 13 जून 2020 (08:13 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. मात्र यावेळी पंतप्रधान पहिल्यांदाच राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, आरोग्य सचिव आणि गृहसचिवांबरोबरही व्हिडीओ कॉन्फ्ररनसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या १७ जून रोजी दुपारी तीन वाजता ही व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे.
 
देशात कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखावर पोहचला आहे. यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मोदी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच यावेळी आवश्यक उपाययोजनांवरही मोदी व मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोदी पहिल्यांदाच विविध राज्यातील गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृहसचिव व आरोग्य सचिवांकडूनही परिस्थिती जाणून घेणार आहेत. ज्या राज्यात संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात व राजस्थानसह इतर राज्यातील मुख्यमंत्र्याचे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरची मतही मोदी जाणून घेणार आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लॉकडाऊनचे किस्से : नवरा ऑफिसच्या व्हीडिओ कॉलवर होता, मी त्याच्यासमोर टॉप काढला, पण मागे आरसा होता