Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

One killed in mob attack at Golden Temple सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यूMarathi National News In Webdunia Marathi
, रविवार, 19 डिसेंबर 2021 (10:15 IST)
सुवर्णमंदिरातील 'रेहरास साहिब' पठणाच्या वेळी एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन 'रुमाला साहिब' वर पाय ठेवून शेजारील तलवार उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथील संतप्त भाविकांनी आणि सेवादारांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना शनिवारी अमृतसरमध्ये घडली.
साधारण २० ते २५ वयाच्या या युवकाने पिवळा फेटा घातला होता. सुवर्णमंदिरात पुजा सुरु असताना तो शांतपणे उभा होता आणि त्याने अचानक उडी मारुन तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ताबडतोब त्याला बाहेर आणण्यात आले आणि वाटेत मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
त्याचा मृतदेह शवागृहात पाठवण्यात आला असून रविवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृताच्या मृतदेहावर कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. तो एकटाच होता की त्याच्यासोबत इतर लोकं होते हे तपासण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असल्याचे उपायुक्त परमिंदर सिंग भंडल यांनी सांगितले.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी ट्वीट करुन म्हटले आहे की, हे "सर्वात दुर्दैवी आणि घृणास्पद कृत्य" असून या प्रकरणाचा खरा हेतू उघड करण्यासाठी तपास केला जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशाच्या कोणत्याही भागात छत्रपतींचा अवमान हा निषेधार्हच-फडणवीस