Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Online Game Ban: केंद्र सरकार 3 प्रकारच्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालणार, आयटी मंत्री म्हणाले

Online Game Ban: केंद्र सरकार 3 प्रकारच्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालणार, आयटी मंत्री म्हणाले
, बुधवार, 14 जून 2023 (16:02 IST)
केंद्र सरकार ऑनलाइन गेमबाबत एक मोठे पाऊल उचलणार आहे. वापरकर्त्यांना हानी पोहोचवणाऱ्या 3 प्रकारच्या गेम्सवर सरकार बंदी घालणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की ते अशा कोणत्याही गेमला परवानगी देऊ शकत नाही, ज्यामुळे वापरकर्त्यांना कोणताही धोका असेल. केंद्रीयआय टी मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणतात की, सरकारने पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगबाबत एक फ्रेमवर्क तयार केला आहे. याअंतर्गत देशात 3 प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात येणार आहे.नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार देशात तीन प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात सरकार ऑनलाइन गेमिंगशी संबंधित मोठी घोषणा करू शकते
 
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, देशात बंदी घालण्याच्या तयारीत असलेल्या खेळांमध्ये सट्टेबाजीचा समावेश आहे, जे वापरकर्त्यांसाठी हानिकारक असू शकतात आणि ज्यामध्ये व्यसनाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी अद्याप त्या विशेष खेळांची कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. 
 
गेल्या काही दिवसांत देश-विदेशात अशा अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये गेमच्या व्यसनामुळे यूजर्सचे मोठे नुकसान झाले आहे.
 
बहुतेक ऑनलाइन गेम असे असतात, जे मानसशास्त्राच्या आधारे वापरकर्त्याला अडकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेले असतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, हे गेम व्यसनाधीन बनतात कारण वापरकर्त्याला त्यामध्ये प्रवेश असतो. उठता-बसता, खाता-पिताही तो आपला खेळ सुरू ठेवतो.
 
यापूर्वी सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव PUBG मोबाइल अॅपवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे डेटा सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉकवरही बंदी घातली होती. 
 
हे ऑनलाइन गेमिंगशी संबंधित नियम आहेत
* IT नियम 2021 मध्ये सुधारणा करण्यात आली, त्यानंतर भारतात उपलब्ध असलेल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर गेममध्ये सट्टेबाजी किंवा जुगार खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.
* जुगाराचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या खेळांवर बंदी घालण्यात येईल.
ज्यांना SRO कडून परवानगी मिळालेली नाही अशा खेळांना प्रोत्साहन दिले जाणार नाही.
* Google Play Store आणि App Store या दोन्हींना हे सुनिश्चित करावे लागेल की त्या गेमला प्लॅटफॉर्मवर स्थान दिले जाणार नाही, ज्यामुळे लोकांचे नुकसान होऊ शकते.
* गेमिंग प्लॅटफॉर्मवर सरकारशी संबंधित चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल.
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मगरीने 10 वर्षाच्या मुलाला गंगेत ओढले, लोकांनी जाळे टाकून बाहेर काढून काठ्यांनी बेदम मारहाण केली